Monday, June 3, 2013

पहिला पाऊस, पहिली आठवणपहिला पाऊस, पहिली आठवण,
पहिलं घरट, पाहिलं अंगण,
 

पहिली माती, पहिला गंध,
 पहिल्या मनात, पहिला बंध,
 

पहिलं आभाळ, पाहिलं रान,
पहिल्या झोळीत, पहिलच पान,


पहिले तळहात, पहिले प्रेम,
पहिल्या सरीचा पहिलाच थेंब,
 

पहिलाच पाऊस, पहिलीच आठवण,
पहिल्या घरट्याच  , पहिलच अंगण..गीत : सौमित्र
गायक: मिलिंद इंगळे
अल्बम: गारवा 

1 comment:

Unknown said...

व्वा ... छान