Sunday, December 28, 2008

मनातल्या मनात मी ..

विडियो:

Lyrics:

मनातल्या मनात मी...
मनातल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो !
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो !

अशीच रोज नाहुनी
लपेट उन्ह कोवळे
असेच चिंब केस तू
उन्हात सोड मोकळे

तुझा सुगंध मात्र मी इथे हळूच हुंगतो !

अशीच रोज अंगणी
लवून वेच तू फुले
असेच सांग लाजुनी
कळ्यांस गूज आपुले

तुझ्या कळ्या, तुझी फुले इथे टिपून काढतो !

अजून तू अजाण ह्या
कुंवार कर्दळीपरी
गडे विचार जाणत्या
जुईस एकदा तरी
'दुरून कोण हा तुझा मरंद रोज चाखतो...?'

तसा न राहिला अता
उदास एकटेपणा
तुझीच रूपपल्लवी
जिथे तिथे करी खुणा
पहा कसा हवेत मी तुझ्यासवे सळाळतो !
.................................... "
विशेष आभार: http://www.sureshbhat.in/node/657

1 comment:

Quality Tale said...

मराठी शब्द कानावर पडले की खूप चांगले वाटते. त्याहीपेक्षा एक महत्वाची गोष्ट म्हणजे या तरूण पिढीचा मराठीभाषेचा असलेला लळा मराठी ला खूप पुढे घेउन जाईल याची खात्री वाटते.