Friday, April 18, 2008

सांग सख्या रे..


सांग सख्या रे.. आहे का ती.. अजुन.. तैशीच गर्द राईपरी..
सांग सख्या रे अजुन का डोळ्यातुन तिचिया झूलते अम्बर..


सांग अजुनही नीजे भोवती तिच्या रात्रिंचे अस्तर..
सांग अजुनही तैशिच का ती अस्मानिच्या निळाईपरी..
फुले स्पर्शता येते का रे अजुन बोटान्मधुनी थरथर..


तिच्या स्वरानी होते का रे सांज अवेळी अजुन कातर..
अजुनही ती घुमते का रे वेळुमधल्या धुंद शिळेपरी..

गीत - संदीप खरे
अल्बम - सांग सख्या रे

1 comment:

uday said...

really very good poems