माझ्या मराठीची बोलू कवतिके.. परि अमृतातेही पैजा जिंके.. ऐसी अक्षरे रसिके मिळविन!! मराठीच्या अभिमानापायी.. जे जे काही चांगले वाचनात आले.. ते इतरांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न!
Saturday, January 19, 2008
नाच रे मोरा, आंब्याच्या वनात
नाच रे मोरा, आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच
ढगांशी वारा झुंजला रे
काळा काळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी, वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच, नाच रे मोरा ...
झरझर धार झरली रे
झाडांची भिजली इरली रे
पावसात न्हाऊ, काहीतरी गाऊ
करुन पुकारा नाच, नाच रे मोरा ...
थेंब थेंब तळयात नाचती रे
टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघात, खेळ खेळू दोघांत
निळया सवंगडया नाच, नाच रे मोरा ...
पावसाची रिमझिम थांबली रे
तुझी माझी जोडी जमली रे
आभाळात छान छान सात रंगी कमान
कमानीखाली त्या नाच, नाच रे मोरा ...
गायक :आशा भोसले
संगीतकार :पु. ल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment