Saturday, January 5, 2008

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा...

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा...


रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ...
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा...
Lyricist :Raja Badhe
Singer :Shaheer Sable
Music Director :Shrinivas Khale
गीतकार :राजा बढे
गायक :शाहीर साबळे

संगीतकार
:श्रीनिवास खळे


No comments: