Friday, January 4, 2008

Marathi Poem

ती सखी लाजली अशी की, शब्द माझे संपले...

त्या तिच्या नयनात गहिर्‍या, भाव माझे गुंतले...
ती सखी लाजली अशी की, शब्द माझे संपले...

मोकळा मग श्वास झाला, धन्य झाल्या भावना;
भास मज झाला असा की, आज जग मी जिंकले...

सावरले मन, बावरले मन, धुंद झाले अन् वेडावले;
पुन्हा त्या क्षितीजास हळव्या, मी नाजुकतेने स्पर्शिले...

तिने माळूनी गजरे कुंतली, मज केले भावगंधीत;
जणू सुगंधाचे पावसाळे, अंगणी माझ्या वर्षिले...

हास्य तिचे निर्मळ, गेले करुनी घाव ह्रदयी;
फिरुनी तिने मागे पुन्हा मग, वेदनेला चुंबीले...

ती सखी लाजली अशी की, शब्द माझे संपले...

~ mahiways

No comments: